कपाशीच्या बोहणीलाच घाटा

By Admin | Updated: October 26, 2014 23:30 IST2014-10-26T23:30:43+5:302014-10-26T23:30:43+5:30

कपाशीचे दर घसरले, खामगावासह पश्‍चिम व-हाडातील शेतकरी चिंताग्रस्त.

Loss of cotton yarn | कपाशीच्या बोहणीलाच घाटा

कपाशीच्या बोहणीलाच घाटा

खामगाव : निर्यातबंदीचा फटका, अपूर्ण पाऊस, परतीच्या पावसाची गैरहजेरी, ऑक्टोबर हिटचा परिणाम.अशा चक्रातून कसेबसे बाहेर पडलेल्या कपाशीच्या उत्पन्नाचे दर कोसळल्याने अवसानच गळाले आहे.
बोहणीलाच घाटा आल्याने शेतकर्‍यांसमोरील संकट गडद झाले असून दिवाळीच्या पर्वावर आर्थिक संकटाचाही सामना शेतकर्‍यांना करावा लागला.
खासगी व्यापारी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कपाशी खरेदी करीत असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटलने खाली कोसळले आहेत.
केंद्र सरकारने कपाशीची निर्यातबंदी केल्याने दर कोसळल्याचा हल्लाबोल राज्यात प्रचाराच्या निमित्ताने होत असून याचा प्रत्यय मात्र शेतकर्‍यांना येऊ लागला आहे. दर कोसळल्याने शे तकर्‍यांमध्ये असंतोष आहे. तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रात सिंचनाखालील कपाशीची लागवड केली जाते.

* ऑक्टोबर हीटचा फटका
तालुक्यात हजारो हेक्टरवर कोरडवाहू कपाशीचा पेरा होतो. यंदा पाऊस लेटलतीफ झाला. प्रारंभी उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने नंतरच्या टप्प्यात ४५ दिवस दडी मारली. यामुळे ऐन वाढीच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम झाला. महिन्याभरापासून ऑक्टोबर हीटमुळे कपाशी पीक मातीमोल झाले असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. गत महिन्यापासून पावसाची कम तरता आहे. परतीच्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून याचा फटका कोरडवाहू क पाशीला बसला आहे. हे उत्पन्न जवळपास ५0 टक्क्याने घटण्याची स्थिती आहे. यामुळे शे तकरी अधिक चिंतित असून याचा परिणाम दिवाळीच्या सणावरही पडला आहे. गेल्या चार वर्षांपासून मशागतीचाही खर्च निघणे मुश्किल झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Web Title: Loss of cotton yarn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.