भगवान महावीर जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 20:37 IST2017-04-09T20:37:26+5:302017-04-09T20:37:26+5:30

अकोला- भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी शहरातुन भक्तीपूर्ण वातावरणात आणि जय जिनेंद्रच्या जयघोषात वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली.

Lord Mahavir Jayanti was celebrated on the occasion of Shobhayatra | भगवान महावीर जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा

भगवान महावीर जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा

अकोला : सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी शहरातुन भक्तीपूर्ण वातावरणात आणि जय जिनेंद्रच्या जयघोषात वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली.
रविवारी महावीर जयंतीनिमित्त सकाळी गांधी-जवाहर बाग येथून महावीर स्तंभचे जैन समाजातील मान्यवरांनी पूजन केले. महिला मंडळाच्या वतीने सकाळी भगवान महावीर यांची पालना आराधना करण्यात आली. त्यानंतर ‘श्री’ १०८ कलशांचा भगवान महावीर यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच अष्टक पूजा आणि आरती करण्यात सायंकाळी श्री सेनगन जैन मंदिरापासून भक्तीपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची देखणी मुर्ती लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे चित्ररथ सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या अग्रस्थानी महिलाभगिनी सहभागी झाल्या होत्या. शहरातील जैन संप्रदायातील शेकडो नागरीक सहभागी झाले होते. सेनगण जैन मंदिर येथून प्रारंभ झालेली शोभायात्रा जयहिंद चौक, कोतवाली चौक येथे आली. तेथुन शोभायात्रा जुना कापड बाजार, जैन मंदिर व गांधी चौकातून पुढे आली. मार्गांवर शोभायात्रेचे विविध धार्मिक व सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा सैतवाल दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली. याठिकाणी शोभायात्रेचे समापन करण्यात आले.

आदिनाथ जैन मंदिरातर्फे शोभायात्रा
गांधी चौक परिसरातील कुंभार गल्लीतील प्राचीन आदिनाथ जैन मंदिरात भगवान महावीरांचा जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरण साजरा करण्यात आला. जैन मंदिरात भगवान महावीरांचे सकाळी विधिवत पूजन करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीरांची भव्य रथावर आदिनाथ जैन मंदिर, संघवीवाडी व वर्धमान भवनातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा कोतवाली चौक, राम मंदिर, टिळक रोड, कापड बाजार, सराफा बाजारमार्गे गांधी चौक आल्यावर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी अंतरिक्ष पार्श्वनाथ भक्ती मंडळातर्फे भक्ती संध्या सादर करण्यात आली.

Web Title: Lord Mahavir Jayanti was celebrated on the occasion of Shobhayatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.