राणी सती धाम येथे भगवान जगन्नाथ झाकी
By Admin | Updated: June 26, 2017 13:35 IST2017-06-26T13:35:50+5:302017-06-26T13:35:50+5:30
राणी सती धाम येथे भगवान जगन्नाथाची झाकी साकार करण्यात आली आहे.

राणी सती धाम येथे भगवान जगन्नाथ झाकी
अकोला: सालाबादप्रमाणे यावषीर्ही स्थानीय राणी सती धाम येथे भगवान जगन्नाथाची झाकी साकार करण्यात आली आहे.पुरी व अहमदाबाद येथील भगवान जगन्नाथाच्या रथोत्सवाच्या धर्तीवर खास पुरी येथून भगवान जगन्नाथाच्या काष्ठ प्रतिमा आणण्यात आल्या आहेत. रथोत्सवाच्या पर्वावर २५ जून रोजी सकाळी ८ वा. स्थानीय राणी सती धाम येथे भगवान जगन्नाथाचा रथ सोहळा साकार करण्यात आला.यासाठी धाम परिसरात भगवान जगन्नाथ,बलराम,सुभद्रा यांची झाकी लावण्यात आली आहे.या सोहळ्यात उपस्थित भाविकांना भगवान जगन्नाथ यांना प्रिय असणार्या भात प्रसादाचे वितरण करण्यात आली.आहे.
या सोहळ्याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आहवान जगदीश बाचुका,सत्यनारायण अग्रवाल,नवीन झुनझुनवाला,प्रमोद झुनझुनवाला,राममनोहर लोहिया,लक्ष्मीकांत पाडिया,राजेष्ठ खिरवाल,कमल गुप्ता,चेतन भाटिया,अनिल पाडिया,राजू करीवाल,सुशील अग्रवाल,विनोद अग्रवाल,मनीष अग्रवाल,दीपक अग्रवाल सजावटकार प्रवीण पवार आदींनी केले.