शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

Loksabha Election 2019 : अकोला पूर्व-पश्चिम, अकोटचा कौल कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 1:49 PM

यावेळी भाजपाचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेस व वंचितमध्ये असलेली स्पर्धा कितपत यशस्वी झाली, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीचेच चित्र पुन्हा उभे ठाकले असल्याने मत विभाजनावरच निवडणुकीचा निकाल फिरणार असल्याचे स्पष्ट आहे. गतवेळी काँग्रेसने खेळलेली खेळी यावेळी कायम आहे तसेच २०१४ ची मोदी लाट यावेळी नव्हती आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नवा पॅटर्न घेऊन रिंगणात होते. २०१४ च्या निवडणुकीत अकोट, अकोला पूर्व व अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला होता. त्यामुळे यावेळी भाजपाचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेस व वंचितमध्ये असलेली स्पर्धा कितपत यशस्वी झाली, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, अकोला पूर्व व अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपानेच यशाचे झेंडे रोवले आहेत. अकोट मतदारसंघात भाजपाने नगरपालिका जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले. या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली असून, शिवसेनाही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडून भाजपाला सर्वाधिक आशा आहे. गतवेळी संजय धोत्रे यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते येथे मिळतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, हा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांचे होम ग्राउंड असल्याने त्यांनाही या मतदारसंघातून मोठ्या मतांच्या शिदोरीची अपेक्षा आहे. गतवेळी पटेल यांच्यापेक्षा धोत्रे यांनी तब्बल ३२ हजार ४२४ मते अधिक घेतले होते. यावेळी मात्र या मताधिक्यात घट येईल, असा दावा काँग्रेस करीत आहे. दुसरीकडे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांचा हा मतदारसंघ असल्याने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना गतवेळीच्या तुलनेत अधिक मते मिळवून देण्याचा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.अकोला पूर्व व पश्चिम हे अकोला महापालिका क्षेत्रात येणारे मतदारसंघ आहेत. आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा राहील, असाच दावा पक्षाकडून होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत अकोला पूर्वमध्ये येणाऱ्या आठ प्रभागांमधून तब्बल सात प्रभांगामध्ये एकहाती पॅनल विजयी करीत आ. सावरकर यांनी आपला प्रभाव अधोरेखित केला होता, तर अकोला पश्चिममध्ये तब्बल २० नगरसेवक भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाचा गड कायम राहील, अशी चर्चा आहे. या दोन्ही मतदारसंघांत गतवेळी भाजपाने मताधिक्य घेतले होते; मात्र अकोला पश्चिममध्ये काँगे्रसने लक्षणीय मते घेऊन आपली ताकद स्पष्ट केली होती. यावेळीसुद्धा पटेल यांच्यासाठी अकोला पश्चिममधील मुस्लीम समाज एकवटला होता. त्यामुळे परंपरागत मतांच्या जोडीने काँग्रेस येथे तगडी फाइट देईल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे अ‍ॅड. आंबेडकरांना अकोला पूर्व या मतदारसंघात गतवेळी दुसºया क्रमांकाची मते होती. त्यामुळे यावेळी या मतांमध्ये निश्चितच वाढ होईल, असा दावा वंचितकडून केला जात आहे. आ. सावरकर यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भाग हा भाजपाकडे जातो की वंचितकडे कायम राहतो, कोणत्या मतदारसंघात काय चालले, याचीच चर्चा असून, त्यावरूनच विजयाची गणिते मांडली जात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९akola-pcअकोला