लोकमत बाल विकास मंचची सदस्य नोंदणी होणार ८ ऑगस्टपासून
By Admin | Updated: August 6, 2014 01:25 IST2014-08-06T01:18:11+5:302014-08-06T01:25:23+5:30
विकास मंच घेऊन येत आहे, भेटवस्तूंसह भरपूर धमाल कार्यक्रमही.

लोकमत बाल विकास मंचची सदस्य नोंदणी होणार ८ ऑगस्टपासून
अकोला: बालविकास मंचची सन २0१४-१५ साठी नोंदणी शुक्रवार, ८ ऑगस्ट २0१४ रोजी प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाल मनाचा सच्चा सवंगडी बाल विकास मंच घेऊन येत आहे, भेटवस्तूंसह भरपूर धमाल कार्यक्रमही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या अनुषंगाने मनोरंजनात्मक स्पर्धात्मक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. समर कॅम्प, सहल, चित्रकला स्पर्धा, विज्ञान खेळणी कार्यशाळा, अँडव्हेंचर कॅम्प या अशा भरपूर कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून बाल विकास मंच सतत कार्यरत असते. येणार्या शैक्षणिक वर्षात अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन आम्ही बाल विकास मंच सदस्यांकरिता केले असून, सदस्यांना ते अगदी मोफत अथवा नाममात्र शुल्क भरून त्यात सहभागी होता येते. बालविकास मंचचे सदस्य होण्यासाठी नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता वार्षिक शुल्क आहे फक्त रु. १५0. सदस्यता नोंदणी करताच सदस्यांना रु. ५00 किमतीच्या हमखास भेटवस्तू मिळणार आहेत. यामध्ये वॉटर बॉटल, सक्सेस स्टोरी बुक सोबतच आइस्क्रीम कोन, मसाला नूडल्स, लेझर शो, मोफत नेत्रतपासणी, मोफत दंत तपासणी व मॉडलिंग फोटोग्राफ, अशा अनेक रु. ५00 किमतीच्या भेटवस्तू कुपन अगदी मोफत तसेच लकी ड्रॉमार्फत भाग्यवंत सदस्यांना बाहेती एंटरप्राईजेसतर्फे ६, बीएसए हरकुलस सायकल, तुलशान वर्ल्ड फर्निचरतर्फे १0 कॉर्नर टेबल, रौनक फर्निचरतर्फे ५ स्टडी टेबल जिंकण्याची सुवर्ण संधी. बाल विकास मंच सदस्यता नोंदणीकरिता सर्मथ आईस्क्रीम पार्लर, रणपिसेनगर, गुरूकृपा सुपर बजार, आळशी प्लॉट, नेहरु पार्क, गोरक्षण रोड, डॉ. भगत आय हॉस्पिटल, टॉवर - उमरी रोड, राऊत मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक व वझे फोटो स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले आहे. तर मग काय, बाल विकास मंच सदस्यता नोंदणी करून मिळवा वर्षभर होणार्या आमच्या कार्यक्रमांसाठी मोफत प्रवेश. अधिक माहितीकरिता बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील- 9970457760 यांच्याशी संपर्क साधावा.