शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Lok Sabha Election 2019 : तेच उमेदवार, तोच गेम प्लॅन फक्त ‘वंचित’चा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:09 PM

विक्रम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जुनेच उमेदवार रिंगणात उतरविले असून, विजयासाठीचा गेम प्लॅनही जुनाच आहे

- राजेश शेगोकारअकोला: पश्चिम वºहाडातील अकोला लोकसभा मतदारसंघ सध्या नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा असल्याने तो राज्यात लक्षवेधी ठरला आहे. भाजपाने सलग चार वेळा हा मतदारसंघ जिंकलेला नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसला सोडून जिंकलेले नाही अन् काँग्रेसने आंबेडकरांची कोंडी करून विजय मिळविलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत कोणाचाही विजय झाला तर तो विक्रम ठरणार आहे. हा विक्रम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जुनेच उमेदवार रिंगणात उतरविले असून, विजयासाठीचा गेम प्लॅनही जुनाच आहे. फक्त गेल्यावेळी असलेल्या भारिप-बमसंला अधिक विस्तारित करीत ‘वंचित बहुजन आघाडी’ या नावाचा तडका तेवढा नवा आहे. मंगळवार अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल झालेल्या अर्जावरून २०१४ च्याच निवडणुकीमधील तिरंगी लढत नव्याने होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.गत १५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यापूर्वी १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये भाजपाचे स्व. पांडुरंग फुंडकर सतत तीनदा या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. फुंडकर आणि धोत्रे यांनी या मतदारसंघात विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली असली, तरी सलग चौथा विजय फुंडकरांना मिळविता आला नाही. भाजपाला हादरा देण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. त्या बळावर १९९८ व १९९९ मध्ये मिळालेले यश पुन्हा एकदा मिळविता येईल, अशी काँग्रेसला आशा होती; मात्र आघाडी फिस्कटल्याने अ‍ॅड. आंबेडकर आणि काँग्रेस स्वतंत्रपणे आता रिंगणात उतरले आहेत.खरे तर राजकारण हे प्रवाही असते. ते स्थिर नसते. त्यामुळे वरवर पाहता २०१९ ची लढाई ही २०१४ सारखीच आहे, असे दिसत असले तरी अनेक मूलभूत बदल झालेले आहेत. भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी मतदारसंघावरील आपली पकड थोडीही सैल केलेली नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र ‘नेटवर्क’ आहे. भाजपामध्ये अंतर्गत वाद प्रचंड असला तरी त्याचा पक्षाच्या कामगिरीवर फरक पडला नसल्याचे महापालिका निवडणुकीचे निकाल दर्शवितात; मात्र २०१४ साली असलेली मोदी लाट आता नाही, त्यामुळे भाजपाला विकासाचा मुद्दा घेऊन सामोरे जावे लागेल. भाजपाकडे पाचपैकी चार आमदार असल्यामुळे या मुद्यावर भाजपा वरचढ ठरत असली तरी अर्धवट असलेली विकास कामे अन् रखडलेले प्रश्न याविषयी लोकांमध्ये असलेला सुप्त रोष वाढणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावीच लागणार आहे. नेमक्या याच मुद्याचे भांडवल करीत काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीला आपली रेष मोठी करावी लागणार आहे. काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा रिंगणात उतरविले आहे. त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षातूनही पाहिजे तेवढा उत्साह व्यक्त झाला नाही. याची कारणे वेगळी असली तरी पटेल यांची उमेदवारी एकदमच कमजोर नाही. दोन वेळा खासदार राहिलेले धोत्रे व राष्टÑीय वलय प्राप्त असलेल्या अ‍ॅड. आंबेडकर यांना गेल्यावेळी टक्कर देताना त्यांनी क्रमांक दोनची मते घेतली होती. त्यांना मिळालेली मते ही सरसकट मुस्लीम समाजाचीच होती, असे गृहीत मांडणे धाडसाचे ठरेल.

मोदी लाटेतही काँग्रेसने टिकवून ठेवलेली ती व्होट बँक होती. त्यामुळे यावेळी या व्होट बँकेत किती मतांची भर ते टाकू शकतात, यावरच त्यांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी घातलेला घोळ, पक्षांतर्गत असलेले गटबाजीचे वातावरण, मतभेदांनी वेढलेल्या राष्टÑवादी काँग्रेसची साथ अशा आव्हानांना पेलत पटेल यांना धोत्रे अन् आंबेडकर या दोन्ही मातब्बरांशी सामना करावा लागणार आहे. केवळ अ‍ॅड. आंबेडकरांची कोंडी करण्याच्याच भूमिकेत ते लढले तर काँग्रेसची व्होट बँक हातची जाऊ शकते, त्यामुळे ते कोणती रणनीती आखतात, यावरही त्यांचे अन् काँग्रेसचेही भविष्य अवलंबून आहे. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त उभ्या महाराष्टÑाचे लक्ष अ‍ॅड. आंबेडकरांच्या रणनीतीकडे लागले आहे. लागोपाठ तीनदा पराभव पत्करल्यानंतर १९९८ व १९९९ च्या निवडणुकांमध्ये मिळालेला विजय ते पुन्हा मिळवू शकले नाहीत. या पृष्ठभूमीवर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा आशावाद अतिशय प्रबळ असा आहे. दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी अशा वंचितांचा जागर करीत त्यांनी भारिप-बमसंला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याचे मोठे धाडसी पाऊल उचलले आहे. या नव्या नावामुळे परंपरागत मतांमध्ये भर पडेल, असा त्यांचा कयास आहे. तो खरा ठरला अन् काँग्रेसने केलेली कोंडी ते फोडू शकले, तर मागील मतांच्या तुलनेत त्यांची उडी किती उंच जाते, यावरच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. या तीन प्रमुख उमेदवारांवरच निवडणुकीचे रिंगण फिरणार आहे. जुनेच खेळाडू असल्यामुळे एकमेकांना एकमेकांची शक्तिस्थळे आणि कमकुवत दुवे माहिती आहेत. यावेळी आता नव्याने कोणती रणनीती आखून प्रत्येक उमेदवार आपली रेष कशी मोठी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Dhotreसंजय धोत्रे