शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Lok Sabha Election 2019: अकोला जिल्ह्यात तरुण मतदार सर्वाधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 13:35 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १५ लाख ८७ हजार २५७ मतदार असून, त्यामध्ये ३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६५ हजार ६५३ तरुण मतदारांची संख्या आहे.

- संतोष येलकर

अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १५ लाख ८७ हजार २५७ मतदार असून, त्यामध्ये ३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६५ हजार ६५३ तरुण मतदारांची संख्या आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तरुण मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड इत्यादी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील १५ लाख ८७ हजार २५७ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये विविध वयोगटातील मतदारांची संख्या लक्षात घेता, एकूण मतदारांमध्ये ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६५ हजार ६५३ मतदार आहेत. त्यानुषंगाने लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांमध्ये सर्वाधिक संख्या असलेल्या तरुण मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जिल्ह्यात वयोगटनिहाय असे आहेत मतदार!वयोगट                                    मतदार१८ ते १९                                     २६,४५९२० ते २९                                  ३,०२,०४१३० ते ३९                                  ३,६५,६५३४० ते ४९                                  ३,३०,२३७५० ते ५९                                  २,४३,१४४६० ते ६९                                  १,५१,०६३७० ते ७९                                      ८३,४६८८० व अधिक                               ५३,७१५नवमतदारांच्या संख्येत होणार वाढ!जिल्ह्यात सध्या १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या २६ हजार ४५९ इतकी असली तरी, गत १ फेबु्रवारी ते १५ मार्चपर्यंत मतदार नोंदणीत १५ हजार २२९ मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. २६ मार्चपर्यंत दुसरी पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नवमतदारांच्या संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक