शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Lok Sabha Election 2019 : मुस्लीम मतांसाठी काँग्रेस -वंचित आघाडीत स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:37 IST

अकोला: परंपरागत दलित मतांसोबत ओबीसीची जोड देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएमचा सहभाग झाल्यानंतर मुस्लीम मतांसाठी वंचित व काँग्रेस आघाडीमध्ये सुरू झालेली स्पर्धा लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसत आहे.

- राजेश शेगोकारअकोला: परंपरागत दलित मतांसोबत ओबीसीची जोड देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएमचा सहभाग झाल्यानंतर मुस्लीम मतांसाठी वंचित व काँग्रेस आघाडीमध्ये सुरू झालेली स्पर्धा लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देत वंचितची कोंडी केली असून, आपली मतपेढी सांभाळण्यासाठी आता कसरत सुरू केली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या नऊ निवडणुकांचा आढावा घेतला, तर ज्या-ज्या वेळी काँग्रेसने मुस्लीम किंवा मराठेतर उमेदवार दिला, त्या-त्या वेळी अ‍ॅड. आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. १९८९ मध्ये काँग्रेसच्या अझहर हुसेन यांनी आंबेडकरांपेक्षा सहा टक्के अधिक मते मिळाली होती, तर १९९१ ला सुधाकर गणगणे, २००४ मध्ये लक्ष्मणराव तायडे यांनीही आंबेडकरांपेक्षा जास्त मते घेत दुसरा क्रमांक कायम ठेवला होता. या निवडणुकांच्या निकालावरून अल्पसंख्याक व ओबीसी उमेदवार आंबेडकरांना घातक ठरतो, हे सिद्ध होते. त्यामुळे यावेळी काँगे्रसने खेळलेली जुनी खेळी उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखत अ‍ॅड. आंबेडकरांनी मुस्लीम समाजातही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मुस्लीम समाजाला तर अध्यक्ष पद कुणबी समाजाला देऊन त्यांनी एकाच वेळी काँग्रेस व भाजपा यांच्या मतांवर हात मारण्याचा डाव टाकला आहे. आंबेडकरांचा हाच डाव हाणून पाडण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत मुस्लीम मते आघाडीकडेच कायम राहतील, अशी व्यूहरचना केली आहे. त्यासाठी अल्पसंख्याक आयोगाचे राष्टÑीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही शनिवारपासून दोन दिवस अकोल्यात तळ ठोकून राहणार आहेत. एका सभेसह ते समाजातील प्रमुख लोकांच्या गाठीभेठी घेणार आहेत. १४ एप्रिल रोजी खासदार अ‍ॅड. मजीद मेनन हे अकोल्यात येत असून, तेसुद्धा जाहीर सभेसह बैठका घेणार आहेत. अल्पसंख्याक आयोगाचे राष्टÑीय महासचिव जावेद जकारिया यांनी या दौºयाची माहिती दिली असून, या दोन्ही नेत्यांचा भर मुस्लीम मतांचे विभाजन टाळण्यावरच राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ओवेसींची टाळली सभाअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत खा. ओवेसी हे राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडवित असले तरी आंबेडकरांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात ते प्रचाराला आले नाहीत. १० एप्रिल रोजी त्यांची प्रस्तावित सभा रद्द करण्यात आली आहे. काँगे्रसने राज्यात केवळ अकोल्यातच मुस्लीम उमेदवार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातच ओवेसींनी प्रचाराला येऊ नये, अशी भूमिका मुस्लीम समाजात असल्यामुळेच ओवेसींनी अकोल्याची सभा टाळल्याची चर्चा आहे. या सभेमुळे वंचितमधील इतर सामाजिक घटक अस्वस्थ होऊ नये, असाही प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस