शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : तिरंगी लढतीत मतांच्या विभाजनाकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:37 IST

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असून, त्यामध्ये गठ्ठा मतांच्या विभाजनात सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असून, त्यामध्ये गठ्ठा मतांच्या विभाजनात सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत मतांचे विभाजन कसे होते आणि त्याचा कोणाला फायदा होणार, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना मिळलेली मते लक्षात घेता, मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची संख्या असलेल्या मराठा व कुणबी समाजाच्या गठ्ठा मतांच्या आधारे यापूर्वीच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये लागोपाठ भाजपा उमेदवाराचा विजय झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मताधिक्य कायम ठेवत भाजप उमेदवाराचा विजय होणार असल्याचे बोलले जात असले; तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारास बहुसंख्य मुस्लीम समाजाच्या मतांसह भाजपाला मिळणाऱ्या मतांपैकी १ लाखावर मते काँग्रेस उमेदवाराकडे वळविण्याची व्यूहरचना महाआघाडीने आखली आहे. तर दुसरीकडे मागासवर्गीयांच्या गठ्ठा मतांसह बहुजनांमधील वंचित घटक आणि काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम समाजाची मते मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. तिरंगी लढतीत मतांच्या विभाजनात गठ्ठा मतांचा कल कोणाकडे जातो आणि त्याचा फायदा कोणाला मिळतो, याकडे आता मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.मुस्लीम समाजाचा कल कोणाकडे?अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील तिरंगी लढतीमध्ये मुस्लीम समाजाची सर्वाधित मते मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत; परंतु यापैकी कोणाला जवळ करायचे, यासंदर्भात मुस्लीम समाजाचा अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे मुस्लीम समाज मतदारांचा कल कोणाकडे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. तथापि, यासंदर्भात येत्या १० एप्रिलनंतर मुस्लीम समाजाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाcongressकाँग्रेसBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक