लोणारच्या बोकडाला दुबईत मागणी !

By Admin | Updated: December 23, 2014 00:05 IST2014-12-22T00:23:15+5:302014-12-23T00:05:50+5:30

लोणार येथील बोकडांना दुबईसह अन्य देशात मागणी.

Loinar's go to Dubai demand! | लोणारच्या बोकडाला दुबईत मागणी !

लोणारच्या बोकडाला दुबईत मागणी !

मयुर गोलेच्छा/ लोणार (जि. बुलडाणा): लोणार येथील बोकडांना दुबईसह अन्य देशात मोठी मागणी होत आहे. लोणार सरोवरामुळे जागतिक पातळीवर ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या नावलौकीकात लोणारच्या बोकडांनी आणखी भर टाकली आहे.
डॉ. अनिल तेजराव मापारी यांच्याकडे ५५ एकर शेती आहे. वैद्यकीय व्यवसाय असला तरी शेतीवर लक्ष केंद्रित करुन त्यांनी एक प्रयोगशील शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. डॉ. मापारी यांनी २00५ मध्ये उस्मानाबादी जातीच्या १८ बकर्‍या व १ बोकड आणून गोटफार्म सुरु करुन शेतीला पुरक व्यवसाय निवडला. राजस्थानमधून शिरोही, चंबल, सोजन जातीच्या व घाटीतून जमनापरी जातीच्या बकर्‍या आणल्या. या बकर्‍यांची योग्य निगा राखल्याने अल्पावधीतच त्यांच्याकडील विविध जातीचे मुब्रा, देवणार आदी बोकड बाजारपेठेत जाऊ लागले. त्यांनी घाटीतून आणलेले जमनापरी शिरोही जातीचे बोकड तर दुबईला पोहचले आहे. या गोटफार्ममधून दरवर्षी ३00 ते ४00 ते नर-मादी तयार होतात. जमनापरी, सोजन, शिरोही जातीच्या बोकडाचे सरासरी वजन १ क्विंटलच्यावर असल्याने त्या बोकडांना १ लाख रुपयांपर्यंत मागणी आहे. या बोकडांच्या आहारात शेंगदाणे, सोयाबीन कुटी, मका कुटीसह काजु बदामाचाही समावेश करून दररोज सकाळ व सायंकाळी १ ते २ लिटर दुध दिले जाते. १ क्विंटलच्यावर वजन असलेल्या व अडीच वर्षे वयाचा ह्यसर्जाह्ण नावाचा जमनापरी बोकड आणि सोजन जातीची बकरी सर्वांचे आकर्षण ठरत आहे. येथे कोकणासह, गोंदीया, नागपूर, हिंगोली, नांदेड, परभणी, औरंगाबाद, लातूर येथील शेतकर्‍यांनी भेटी दिल्या आहेत. शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य न घेता विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील हे एकमेव बोकडपालन केंद्र म्हणून ओळखले जाते. डॉ. मापारी युवा शेतकर्‍यांना शेतीसोबतच जोडव्यवसाय करण्यास मार्गदर्शन करत आहेत.

Web Title: Loinar's go to Dubai demand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.