कुंभार व्यवसायाला लाॅकडाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:41+5:302021-04-28T04:19:41+5:30
मूर्तिजापूर शहरातील जुन्या वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर दरवर्षी तीन ते चार माठांची दुकाने थाटली आहेत; परंतु शासनाच्या या नियमानुसार सकाळी ...

कुंभार व्यवसायाला लाॅकडाऊनचा फटका
मूर्तिजापूर शहरातील जुन्या वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर दरवर्षी तीन ते चार माठांची दुकाने थाटली आहेत; परंतु शासनाच्या या नियमानुसार सकाळी ७ ते ११ वेळ दिली आहे. या वेळेत त्यांना माठ विकता येत नाहीत. त्यामुळे प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील दर आठवड्याला भरणारा आठवडी बाजार रद्द झाल्याने माठ विक्रेत्यांना माठ विकणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात माठ खरेदी करीत होते; परंतु वेळेअभावी त्यांना शहरात येता येत नाही. त्यामुळे कुंभार समाजासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात माठ तयार केले; परंतु ग्राहक फिरकत नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कुंभार समाजाला आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माठ विक्रेता स्वप्नील गोपाळ खानापुरे यांनी केली आहे.
फोटो : ईएमएस