गावठी दारूभट्टी चालविणारा एक वर्षांसाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:20+5:302021-03-27T04:19:20+5:30

अकोला पोलिसांनी केली एमपीडीए अंतर्गत कारवाई अकोला : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांब येथील रहिवासी तसेच अवैधरीत्या दारूभट्टी चालविणाऱ्या ...

Located for one year running a village distillery | गावठी दारूभट्टी चालविणारा एक वर्षांसाठी स्थानबद्ध

गावठी दारूभट्टी चालविणारा एक वर्षांसाठी स्थानबद्ध

अकोला पोलिसांनी केली एमपीडीए अंतर्गत कारवाई

अकोला : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांब येथील रहिवासी तसेच अवैधरीत्या दारूभट्टी चालविणाऱ्या इसमास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशानंतर शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी हा सपाटा सुरू केला आहे.

पातूर तालुक्यातील जांब येथील रहिवासी रामचंद्र श्रीराम जठाड (वय ३८) हा अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, दारूची वाहतूक करणे तसेच अवैधरीत्या गावठी दारूची विक्री करीत असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी वारंवार कारवाई केलेली आहे; मात्र त्यानंतरही तो गावठी दारूभट्टी अवैधरीत्या चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला तो जुमानत नसल्याने अकोला पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, मंगेश महल्ले यांनी केली.

Web Title: Located for one year running a village distillery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.