जिल्हाप्रमुख पदासाठी मुंबईत लॉबिंग

By Admin | Updated: May 9, 2015 01:55 IST2015-05-09T01:55:45+5:302015-05-09T01:55:45+5:30

शिवसेनेची अवस्था बिकट; सक्षम उमेदवारच सापडेना!

Lobbying in Mumbai for the post of District Head | जिल्हाप्रमुख पदासाठी मुंबईत लॉबिंग

जिल्हाप्रमुख पदासाठी मुंबईत लॉबिंग

आशिष गावंडे/ अकोला: शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी बदलण्याचे फर्मान पक्षप्रमुखांनी सोडल्यानंतर जिल्हाप्रमुख पदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू आहे. जिल्हाभरात भक्कम पाय रोऊन उभा असलेला शिवसेनेचा वटवृक्ष शहरी भागापुरता र्मयादित झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. भाजपसह इतर राजकीय पक्षांना कडवे आव्हान देऊ शकणार्‍या कार्यकर्त्याच्या गळ्य़ात जिल्हा प्रमुखपदाची माळ पडणार असली तरी सक्षम उमेदवाराचा शोध घेताना पक्षाची चांगलीच दमछाक होत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या पश्‍चिम विदर्भात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सपाटून मार खावा लागला. सेनेच्या ताब्यातील बहुतांश जागा मोदी लाटेत भाजपने सर केल्या. भाजपने केलेली सरशी पश्‍चिम विदर्भाचे संपर्कप्रमुख राहिलेल्या दिवाकर रावते यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले. शिवाय मागील दहा वर्षांत अंतर्गत कलहापायी शिवसेना मोडीत निघाली. ज्या नेते-कार्यकर्त्यांनी पश्‍चिम विदर्भात शिवसेनेचे रोपटे वाढवले, नेमके त्यांनाच प्रवाहाच्या बाहेर फेकण्यात आले. मुंबईत बसून पक्षाची सूत्रे हलविणार्‍या नेत्यांच्या नाहक हस् तक्षेपामुळे पक्षात नवीन नेतृत्वच उदयास आले नाही. मध्यंतरी पक्षप्रमुखांनी दिवाकर रावते यांच्याकडील पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी मुंबईतील मलबार हिलचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे सोपवली. खा.सावंत यांच्याकडून पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अ पेक्षा आहे. पक्षप्रमुखांनी जिल्हाप्रमुख बदलाचे आदेश दिल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांच्या मुंबई वार्‍या वाढल्या आहेत.

Web Title: Lobbying in Mumbai for the post of District Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.