ग्रा.पं.च्या संग्राम कक्षात कर्जमाफीचे अर्ज स्वीकारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:01 IST2017-08-26T23:01:23+5:302017-08-26T23:01:23+5:30

ग्रा.पं.च्या संग्राम कक्षात कर्जमाफीचे अर्ज स्वीकारणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतक-यांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज सेतू केंद्रांवर भरून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षात कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश अकोल्याचे प्रभारी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शनिवारी ग्रामसेवकांना दिले.
कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने अकोला तालुक्यात २२ ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षात कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.