Loabours from gujrat stopped at Balapur | गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले!

गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले!

ठळक मुद्दे बाळापूर ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या मजुरांची बाळापुरातील विविध ठिकाणी निवाºयाची सोय करण्यात आली.

बाळापूर: गुजरातहून तीन ट्रकमध्ये बसून अकोल्यात येत असलेल्या ११८ मजुरांना पोलिसांनी बुधवारी शेगाव टी पॉर्इंटवरील नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतले. तीनही ट्रकच्या चालकांविरूद्ध पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आहे. या सर्वांची प्रकृती सध्या उत्तम आहे. या मजुरांची बाळापुरातील विविध ठिकाणी निवाºयाची सोय करण्यात आली.
शेगाव टी पॉर्इंटवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना बुधवारी तीन ट्रक येताना दिसले. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, या ट्रकमध्ये ११८ मजूर असल्याचे दिसून आले. ट्रकचालकांची चौकशी केली असता, या मजुरांना गुजरात राज्यातून आणल्याचे त्याने सांगितले. ट्रकमधील सर्व लोकांची यापूर्वी देखिल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्व लोकांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी ३५ बाळापूर नगर परिषद सभागृहात, शेळद कन्या शाळा येथे ४२ लोकांची आणि राष्ट्रीय महामार्गावरील आयटीआय कॉलेज येथे ४१ लोकांची राहण्याची व खाण्याची सोय करण्यात आली आहे. या मजुरांसोबत लहान मुलांचा देखील समावेश आहे. याठिकाणी या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. गुजरात राज्यातून मजुरांना घेऊन येणारे ट्रकचालक राकेश संतोष ठाकरे, प्रदीप भास्कर जिपकंडे (रा.नागपूर)यांच्याविरूद्ध बाळापूर पोलिसांनी भादंवि कलम १८८, २६९, २७0 व राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २00५ कलम ५१ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ व मोटार वाहन कायदा कलम १९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालकांचे तीनही ट्रक जप्त करण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)

येथील राहणारे आहेत मजूर!
मूर्तिजापूर येथे राहणारे ३४, कारंजा येथील ३५ , बाभूळगाव(पातूर) येथील ३0 आणि नेर येथील १४ मजुरांचा समावेश आहे. हे सर्व मजूर गुजरात राज्यात कामासाठी गेले होते.

जिल्हा सिमेवर वाहनांची तपासणी करताना, बाळापूर पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या तीन ट्रकला रोखले. या ट्रकमध्ये ११८ मजूर होते. या सर्वांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे हे मजूर गुजरातहून परतत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली आहे. पुढे त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येईल.
-पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर

 

Web Title: Loabours from gujrat stopped at Balapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.