कत्तलीसाठी नेत असलेल्या १७ बैलांना जीवनदान

By Admin | Updated: June 14, 2017 02:10 IST2017-06-14T02:10:05+5:302017-06-14T02:10:05+5:30

चार महिन्यांत दुसरी कारवाई

Livelihood for 17 bulls taken for slaughter | कत्तलीसाठी नेत असलेल्या १७ बैलांना जीवनदान

कत्तलीसाठी नेत असलेल्या १७ बैलांना जीवनदान

अंदुरा/उरळ: अंदुरा-सोनाळा (पूर्णा) शेतशिवारातून चोरट्या मार्गाने कत्तलीसाठी नेत असलेल्या १७ बैलांना उरळ पोलिसांनी १२ जून रोजी रात्री १ वाजता जीवनदान दिले. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हिवरखेड येथून हातरुणकरिता जनावरांना कत्तलीकरिता अंदुरा-सोनाळा (पूर्णा) शेतशिवारातून नेण्यात येत असल्याची माहिती उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार यांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार पवार व त्यांच्या ताफ्याने अंदुरा-सोनाळा शेतशिवारात दाखल झाले. त्यांना शे. आसीफ शे. रहीम व शेख मुजम्मील शे. जहीर हे जनावरे घेऊन जात असताना आढळले. पोलिसांनी दोघांनाही जनावरांविषयी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडील १७ बैल जप्त केले. तसेच दोन्ही आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार सोमनाथ पवार, पोना राम आंबेकर, पोकॉ संतोष मेहेंगे, गजानन ठोंबरे,मंगेश शेगोकार, पंजाब इंगळे यांनी केली.

 

Web Title: Livelihood for 17 bulls taken for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.