जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटले!
By Admin | Updated: October 3, 2014 02:01 IST2014-10-03T02:01:41+5:302014-10-03T02:01:41+5:30
अकोला येथे गुंगीचे औषध देऊन प्रवाशाकडील २ लाख ६१ रुपयांचा ऐवज लुटला.

जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटले!
अकोला : जेवणातून गुंगीचे औषध देऊन प्रवाशाकडील सोन्याचे दागिने व रोख, असे एकूण २ लाख ६१ रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी रात्रीदरम्यान नवजीवन एक्स्प्रेसमध्ये मूर्तिजापूर लोहमार्गावर घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सुरत येथील ७४ वर्षीय नरेशभाई मोहनभाई भोजक याला बुधवारी अटक केली.
त्याला गुरुवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे अँड. तृप्ती मिटकरी यांनी तर आरोपीतर्फे अँड. केशव एच. गिरी यांनी काम पाहिले.