जीवंत विद्युत तारा तुटून अंगावर पडल्या, इसमाचा मृत्यू
By Atul.jaiswal | Updated: November 30, 2022 14:49 IST2022-11-30T14:49:10+5:302022-11-30T14:49:21+5:30
माहितीनुसार तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम जितापुर खेडकर येथे राहणारे विनोद केशव तिवारी वय ४५ वर्षे हे आपल्या घराच्या अंगणात सकाळी काम करीत असताना अचानक विद्युत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली.

जीवंत विद्युत तारा तुटून अंगावर पडल्या, इसमाचा मृत्यू
मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ग्राम जितापूर खेडकर येथे घराच्या अंगणात काम करत असताना अचानक जीवंत विद्युत तारा तुटून अंगावर पडल्याने ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ही घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप मृतकाच्या नातलगांनी केला आहे. विनोद केशव तिवारी (४५) असे मृतक इसमाचे नाव आहे.
माहितीनुसार तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम जितापूर खेडकर येथे राहणारे विनोद केशव तिवारी वय ४५ वर्षे हे आपल्या घराच्या अंगणात सकाळी काम करीत असताना अचानक विद्युत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. सदर विद्युत तारे मध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्याचा तीव्र धक्का त्यांना बसला. विजेच्या धक्क्याने ते गंभीर जखमी झाले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच विनोद तिवारी यांना गंभीर अवस्थेत येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.