शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जागर मंचच्या धर्तीवर सिन्हांचा ‘राष्ट्रमंच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 03:57 IST

शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळालेले यश यामुळेच येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी दिल्ल्लीमध्ये ‘राष्ट्रमंच’ नावाचे स्वतंत्र विचार मंचची ते पायाभरणी करीत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

- राजेश शेगोकारअकोला : शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंतसिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळालेले यश यामुळेच येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी दिल्ल्लीमध्ये ‘राष्ट्रमंच’ नावाचे स्वतंत्र विचार मंचची ते पायाभरणी करीत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.यशवंत सिन्हा यांनी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या व्यासपीठावर येत नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या विरोधात आसूड ओढले होते. या व्याख्यानादरम्यानच त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलन उभारण्याची घोषणा केलीहोती. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी आयोजित कापूस-सोयाबीन-धान ‘कासोधा’ परिषदेत त्यांनी आंदोलन पुकारुन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडला होता.या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे सिन्हायांना नव्या लढाईचे बळ मिळाले. त्यातूनच शेतकरी जागर मंच आकाराला आला आहे.‘राष्टÑमंच’साठी यशवंत सिन्हा यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी, युवा नेते रविकांत तुपकर, माजी खासदार नाना पटोले, आमदार आशिष देशमुख, शंकर अण्णा धोंडगे आदींसह अकोल्यातून शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, रवी अरबट, डॉ.दीपक धोटे, मो.रेहान यांना आमंत्रित केले आहे.‘कासोधा’च्या आश्वासनांची पूर्ती नाहीशेतकरी जागर मंचने पुकारलेल्या ‘कासोधा’ आंदोलनाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या; मात्र आंदोलन होऊन दीड महिना संपला, तरी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकरी जागर मंच पुन्हा आंदोलनाची तयारी करीत असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र