अकोला: बसस्थानकवरून आॅटोरिक्षात बसून डाबकी रोडकडे जात असताना, दोन अज्ञात महिलांनी बॅगेतील सोन्याची अडील लाख किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार दोन अज्ञात महिलांलिरूद्ध ७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.चान्नी येथे शारदा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या १ डिसेंबर रोजी बसस्टॅडवरून त्यांच्या आईसोबत आॅटोरिक्षामध्ये डाबकी रोडवर राहणाºया दिराकडे जाण्यास निघाले. दरम्यान गांधी चौकातून दोन अनोळखी महिला आॅटोरिक्षामध्ये बसल्या. गांधी रोड ते डाबकी रोडवरील श्रीराम टॉवरदरम्यान या अनोळखी महिलांनी शारदा शर्मा यांच्याजवळील बॅगेत ठेवलेले २ लाख ५३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अलगद काढून घेतले. शारदा शर्मा या दीराकडे परतल्यावर, त्यांना बॅगेत सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार बुधवारी अनोळखी महिलांविरूद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
अकोल्यात आॅटोरिक्षामध्ये बसलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 18:04 IST
अकोला: बसस्थानकवरून आॅटोरिक्षात बसून डाबकी रोडकडे जात असताना, दोन अज्ञात महिलांनी बॅगेतील सोन्याची अडील लाख किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार दोन अज्ञात महिलांलिरूद्ध ७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
अकोल्यात आॅटोरिक्षामध्ये बसलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास
ठळक मुद्देबसस्थानकाावरून डाबकी रोडकडे जात होती महिला.दोन अज्ञात महिलांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल.