तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 19:01 IST2019-10-30T19:01:54+5:302019-10-30T19:01:57+5:30
तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या.

तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार
अकोला : शेतात काम करत असताना वीज कोसळून तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. या घटनांमध्ये अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
तेल्हारा तालुक्यातील वरुड येथील गणेश वामनराव मोकळकार, नागोराव गुलाबराव अढाऊ, गजानन गुलाबराव अढाऊ, मीना गोपाल नारे, वैष्णवी नागोराव अढाऊ व लक्ष्मी नागोराव अढाऊ हे पाच जण वरुड-भोकर शिवारातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दुपारी अडीच वाजजाचे सुमारास अचानक वातावरण बदलले व विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अचानक शेतात वीज कोसळली. यामध्ये गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ हे या तीघांचा मृत्यू झाला. तर नागोराव अढाऊ व वैष्णवी अढाऊ हे गंभीर जखमी झाले.
दुसºया घटनेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.नेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.