शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दोन्ही आरोपींना जन्मठेप

By admin | Updated: December 18, 2014 00:58 IST

माजी आमदाराच्या स्वीय सचिवाचे खून प्रकरण.

अकोला: माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे स्वीय सचिव ज्ञानेश्‍वर वानखडे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी शैलेश रामसिंग राठोड (४१) व त्याचा भाचा यशपाल मदनलाल जाधव (२१) यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे स्वीय सचिव ज्ञानेश्‍वर वानखडे यांची ९ नोव्हेंबर २0१३ रोजी निर्घृण हत्या झाली होती. घटनेच्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता अकोल्यातील जागृती विद्यालयाजवळील बिरकड यांच्या कार्यालयासमोर आरोपी शैलेश राठोड व यशपाल जाधव यांनी लोखंडी पाईप आणि कत्त्याने ज्ञानेश्‍वरवर वार केले. बिरकड यांच्या कुंभारी येथील शाळेतील शिपाई नारायण महादेव धनागरे आरोपींना आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी त्याला बाजूला ढकलले. ज्ञानेश्‍वर रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर, आरोपी घटनास्थळाहून पळून गेले. तुकाराम बिरकड घटनास्थळी पोहोचल्यानंतर, ज्ञानेश्‍वरला रुग्णालयात भरती करण्यात आले. उ पचारादरम्यान दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. नारायण धनागरे याने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर भादंवि कलम ३0२ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शैलेश राठोड याला घटनेच्या दिवशी, तर दुसर्‍या दिवशी त्याचा भाचा यशपाल याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून रक्ताने माखलेले कपडे, लोखंडी पाईप व कत्ता जप्त केला. एपीआय शेळके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सुभाष काटे यांनी तर आरोपींतर्फे अँड. मोहन मोयल, अँड. दिनेश खुराणिया यांनी बाजू मांडली.