विज्ञानामुळेच जीवन सहज, सुसह्य
By Admin | Updated: January 7, 2015 01:32 IST2015-01-07T01:32:38+5:302015-01-07T01:32:38+5:30
श्री शिवाजी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विषयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उच्च शिक्षण सल्लागार जामोदे यांचे प्रतिपादन.

विज्ञानामुळेच जीवन सहज, सुसह्य
अकोला : मानवी जीवनाच्या विकासात विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानामुळे जीवन सहज व सुसह्य झाले असल्याने प्रत्येक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन खोलवर रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अमरावती येथील उच्च शिक्षण सल्लागार डॉ. एम. व्ही. जामोदे यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने ह्यमायक्रोबॉयल सायन्समधील नवा प्रवाहह्ण या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. एम. व्ही. जामोदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, बांग्लादेशातील राजशाही विद्यापीठाचे डॉ. गुलाम शब्बीर सत्तार, डॉ. तंजिमा यास्मिन व डॉ. लत्फनिसा बारी, मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे व समन्वयक डॉ. मुसाद्दिक खान उपस्थित होते. डॉ. तंजिमा यास्मिन यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील आधुनिक प्रवाहाबद्दल माहिती विविध उदाहरणांद्वारे सादर केली. उद्घाटन सत्रानंतर दुबईहून डॉ. निरू सूद यांचे व्हच्यरुअल मार्गदर्शन थेट प्रसारित करण्यात आले. त्यांनी जीवशास्त्र विषयात घडणार्या विविध बदलांची व नवीन प्रवाहांची माहिती दिली. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. ए. एम. देशमुख यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले. जेवणानंतर झालेल्या दुपारच्या सत्रात डॉ. लत्फनिसा बारी यांचे मार्गदर्शन लाभले. या सत्राच्या अध्यक्षपदी प्रा. देवकर होते. सूत्रसंचालन डॉ. दीपाली बराटे यांनी केले. आभार डॉ. आशीष राऊत यांनी मानले.