घरातच केले ग्रंथालय, संग्रहालय

By Admin | Updated: May 15, 2015 00:53 IST2015-05-15T00:53:20+5:302015-05-15T00:53:20+5:30

खामगाव येथील ध्येयवेड्या इसमाचा आगळा छंद.

The library, museum made in the house | घरातच केले ग्रंथालय, संग्रहालय

घरातच केले ग्रंथालय, संग्रहालय

अनिल गवई /खामगाव : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हणतात ते उगीच नाही.. प्रत्येकाचे छंद.. आवडी-निवडी या निरनिराळ्या. आपल्यानंतर आपल्या पुढील पिढीस इतिहासाची जाणीव व्हावी म्हणून खामगाव शहरातील प्रतापसिंह निंधाने ध्येयवेड्या इसमाने घरातच गं्र थालय आणि संग्रहालय सुरू करून समाजासमोर नवीन पायंडा ठेवला आहे. सती फैल मेहतर कॉलनीत माजी पोलीस अधिकारी प्रतापसिंह निंधाने यांचे सुमारे पाच हजार चौरस फुटामध्ये घर आहे. यामध्ये वरच्या माळ्यावर ते स्वत: आपल्या परिवारासह राहतात. याच ठिकाणी त्यांनी जमिनीशी समतल असलेल्या माळ्यावर पाहुणे मंडळीसाठी तसेच शहरात कार्यक्रमासाठी येणार्‍या मान्यवरांसाठी काही खोल्या बांधल्या आहेत. या खोल्यानांच लागून ४0 बाय ५0 चौरस फुटाचे सभागृह असून, या सभागृहाच्या भींतीवर विविध महापुरुषांचे तैलचित्र माहितीसह त्यांनी लावले आहे. यामध्ये पुरातन ऐतिहासिक तैलचित्र आणि माहितीचा खजिनाच पुढील पिढीसाठी उपलब्ध करून दिला आहे. परिसरातील नागरिकांसह त्यांच्याकडे येणार्‍या पाहुण्यांसह इतिहास अभ्यासात रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नि:शुल्क हे संग्रहालय व ग्रंथालयाचे दालन खुले करून दिले आहे.

*एकाच छताखाली ठेवा

          निंधाने यांनी समाज सुधारकांपासून इतिहास तज्ज्ञ, देवी देवता, शास्त्रज्ञ, क्रिकेटर, सिने अभिने ते, समाजसुधारक यांच्या तैल चित्रांसह त्यांच्या कार्याची तसेच जीवनपटाची माहिती त्यांच्याकडील संग्रहालयात उपलब्ध केली आहे. यामुळे या महापुरुषांची तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची माहिती होते.

Web Title: The library, museum made in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.