उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:15+5:302021-02-08T04:17:15+5:30

अकोला: खूप दिवसांपासून साठवून ठेवल्या आहेत तिच्यावरील प्रेमाच्या अलवार भावना, पण हिंमतच होत नाही ना. ती नकार तर देणार ...

Let the storm blow away! | उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं!

उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं!

अकोला: खूप दिवसांपासून साठवून ठेवल्या आहेत तिच्यावरील प्रेमाच्या अलवार भावना, पण हिंमतच होत नाही ना. ती नकार तर देणार नाही ना? पण असा कुठंवर झुरत बसणार आहेस? प्रंमाची ही घुसमट थांबवययची आहे ना, मित्रांनो... मग आज दिवस तुमच्या प्रेम अभिव्यक्तीसाठी परफेक्ट आहे.

व्हॅलेंटाईन वीक युवकांकडून साजरा केला जात आहे. रविवारी रोझ डे उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाब खरेदीसाठी युवकांची गर्दी दिसून आली. प्रपोज प्रेमाचे असो वा मैत्रीचे... जिवलगाच्या हृदयापर्यंत भावना पोहोचण्यासाठी तयार रहा. नकार मिळेल कदाचित, पण मनातल्या तरल प्रेमाचा उलगडा केला याचे लाखमोलाचे समाधान तर मिळेल.

-------------------------------

प्रामाणिक राहा, फसवू नका...

असे म्हणतात, हरवलेली वस्तू हरवलेल्या जागी शोधता येते, पण हरवलेला विश्वास पुन्हा त्या जागी शोधणे कठीण असते. त्यामुळे प्रामाणिक राहा.

-----------------------------------

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी रोझ डेला तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जीवलगांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियात रोझ डे निमित्त विविध आकर्षक संदेशाची देवाणघेवाण झाली. तसेच प्रपोज डे सुद्धा सोशल मीडियाद्वारे साजरा होणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Let the storm blow away!