सख्यांनी घेतले केक बनविण्याचे धडे
By Admin | Updated: August 4, 2014 20:30 IST2014-08-04T00:53:32+5:302014-08-04T20:30:21+5:30
लोकमत सखी मंच: केक मेकिंग व आईसिंग कार्यशाळा उत्स्फूर्त प्रतिसाद

सख्यांनी घेतले केक बनविण्याचे धडे
अकोला : वाढदिवस म्हटला की हमखास आठवतो तो केक. केकशिवाय वाढदिवस कदाचितच कुठे साजरा होत असेल. अशा या केकला बनविण्याचे आणि सजविण्याचे तंत्र शुक्रवारी सख्यांनी आत्मसात केले. केक मेकिंग वा आईसिंग कार्यशाळेला सख्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमत सखी मंचच्यावतीने दुसर्यांदा हॉटेल सेंटर प्लाझा येथ केक मेकिंग व आईसिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन राजश्री प्रशांत देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ह्यलोकमतह्णचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मंचावर शेफ गजानन तायडे, चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्ली येथील सीमा सारडा व राजश्री लद्दड उपस्थित होत्या. या कार्यशाळेत सख्या मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्ली येथील शेफ गजानन तायडे तसेच सीमा सारडा यांनी सख्यांना मार्गदर्शन केले. गजानन तायडे यांनी सोप्या पद्धतीने केक बनवून सजविणे शिकविले. तायडे यांनी आईसिंग फेस्टिवल केक, आईसिंग डिजाइनर केक, आईसिंग चॉकलेट केक, आईसिंग फ्लावर बास्केट केक, आईसिंग बार्बी डॉल केक बनविणे शिकविले. राजश्री लद्दड यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट केक बनविणे शिकविले. याशिवाय बिस्किट केक, इंडियन ब्लक फॉरेस्ट आणि मार्बल केक सोप्या पद्धतीने बनविणे शिकविले. यावेळी सख्यांना तीन प्रकारचे केक बनविण्याची रेसेपी झेरॉक्स करून वाटण्यात आली. कार्यशाळेसाठी सखी मंच विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले. संचालन लोकमत सखी मंच संयोजिका मीनाक्षी फिरके यांनी केले.