लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : आलेगाव परिसरात गोळेगाव शेतशिवारात उत्तरेकडील भागात अनेकांना बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मुरलीधर लाड व गणेश बोचरे यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर काही शेतकर्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे बंद केले आहे.या परिसरात पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने वन्य प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत असून शेतकरी त्रस्त आहेत. अशातच बिबट्याच्या आगमनामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. यापूर्वी २00५ मध्ये येथील शेतकरी प्रल्हाद मोतीराम गिर्हे यांच्यावर हल्ला करून जबर जखमी केले होते; मात्र त्यावेळी प्रल्हाद गिर्हे बचावले. २00५ मध्येच मे महिन्यात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सन २0१३ मध्ये उन्हाळ्याच्या वेळी गुलाब गिर्हे यांच्या केळीच्या शेतात अनेक शेतकर्यांना पट्टेदार वाघ पाहावयास मिळाला होता. २0१४ मध्ये नागेश काकड यांना गोळेगाव शिवारात बिबट दिसला होता, हे विशेष.
आलेगाव परिसरातील गोळेगाव शेतशिवारात बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:58 IST
आलेगाव परिसरात गोळेगाव शेतशिवारात उत्तरेकडील भागात अनेकांना बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मुरलीधर लाड व गणेश बोचरे यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर काही शेतकर्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे बंद केले आहे.
आलेगाव परिसरातील गोळेगाव शेतशिवारात बिबट्या
ठळक मुद्देउत्तरेकडील भागात अनेकांनी पाहिल्याची माहितीग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण