लोकसभेतील मतांवर विधानसभेचे गणित

By Admin | Updated: May 10, 2014 22:43 IST2014-05-10T22:37:16+5:302014-05-10T22:43:15+5:30

प्रत्येकच आमदार आपल्या पक्षाला प्रचंड आघाडी मिळेल

Legislative assembly in the Lok Sabha elections | लोकसभेतील मतांवर विधानसभेचे गणित

लोकसभेतील मतांवर विधानसभेचे गणित

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतांची आघाडी मिळते, यावर आगामी विधानसभेतील उमेदवारी आणि मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे. सध्या प्रत्येकच आमदार आपल्या पक्षाला प्रचंड आघाडी मिळेल, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या या दाव्याचा फुगा १६ मे रोजी फुटणार आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार, याबाबत गेल्या महिनाभरापासून तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती मोदी लाट, अल्पसंख्याक चेहरा, मराठा कार्डाची नाराजी, कुणबी, आदिवासी, बंजारा समाजाची गठ्ठा मते, अल्पसंख्यकांची मते, मतविभाजन असे वेगवेगळे निकष लावून अंदाज बांधत आहेत. आपलाच अंदाज कसा खरा ठरणार, यासाठी जातीय समीकरणांचे पुरावेही देत आहेत. काहींनी कोणत्या विधानसभा मतदार संघात कोणता उमेदवार चालला, कोणत्या उमेदवारास किती लिड मिळेल, याचे कागदावर गणित मांडत आहेत. सदर कागदाच्या फोटो काढून व्हॉटसअपवर मित्रांना पाठवत आहेत. सध्या एकूणच जर-तरवर अंदाज बांधले जात असले तरी प्रत्यक्ष निकालासाठी आता आणखी केवळ ५ दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकालानंतर मात्र वास्तव उघड होणार आहे. शेवटी लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मतांची आघाडी मिळते, यावर तेथील आमदारांचे वजन ठरणार आहे. मतांच्या आघाडीवर आगामी विधानसभेची उमेदवारी ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, हे मात्र १६ मे नंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Legislative assembly in the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.