आयएमएच्या वतीने विषयावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:32+5:302021-06-05T04:14:32+5:30
............ होली क्रॉसतर्फे रविवारी रक्तदान शिबिर अकोला : होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलतर्फे रविवार ६ जून रोजी रक्तदान शिबिराचे ...

आयएमएच्या वतीने विषयावर व्याख्यान
............
होली क्रॉसतर्फे रविवारी रक्तदान शिबिर
अकोला : होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलतर्फे रविवार ६ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. होली क्रॉस कॉन्व्हेंट येथे मदर क्लाउडीन मेमोरियल हॉलमध्ये जास्तीत जास्त पालकांनी व इतरही रक्तदात्यांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल तर्फे करण्यात आलेले आहे.
...................
पश्चिम विदर्भासाठी रुग्णवाहिका द्या
अकोला : वाढत्या कोरोना संकटात पश्चिम विदर्भातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जोमाने वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था कमी पडत असून ही व्यवस्था केंद्र शासनाकडून पूर्ण करण्याची मागणी भाजप कामगार नेते देवेंद्र सपकाळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली.
...........................
कोरोना काळात आशांचे काम काैतुकास्पद
अकोला : काेराेना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर्सचे काम काैतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. रणधीर सावरकर यांनी केले. शुक्रवारी पश्चिम उत्तर मंडळ अकोला महानगर प्रभाग क्रमांक ८ मध्ये परिसरातील आशा वर्कर्स चा साडीचोळी, प्रशस्ती पत्रक, पुष्पगुच्छ देऊन अकोला पूर्वचे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अकोला महानगर सरचिटणीस संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, संजय गोटफोडे, संजय गोडा, मंडळ अध्यक्ष नीलेश निनोरे आदी उपस्थित होते.
फाेटाे
...........................