वान जलवाहिनीला गळती; अकोटचा तीन दिवस पाणी पुरवठा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:56+5:302021-05-15T04:17:56+5:30
वान धरणातून अकोट शहरासह ८४ खेडी योजनातील गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो, पंरतु या जलवाहिनीला मोठी गळती लागली ...

वान जलवाहिनीला गळती; अकोटचा तीन दिवस पाणी पुरवठा बंद!
वान धरणातून अकोट शहरासह ८४ खेडी योजनातील गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो, पंरतु या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. तब्बल आठ ठिकाणी मुख्य जलवाहिनीतून पाण्याचे पाट वाहत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पुरवठावर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याचे जास्त आवश्यकता भासत असतांना कृत्रिम पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. शहरात कुठ दररोज तर काही भागात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होता. (फोटो)
----------------------------
शहरातील काही भागात दूषित पाणी पुरवठा
शहरातील काही भागात दुषित माती मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने कोरोनाच्या संकटात नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. शहरात रोगराई, आजाराने डोक वर काढले असून, दुसरीकडे जलवाहिनीवरील पाण्याची नासाडी पाहता ठिकठिकाणी शुद्ध पाण्याचे डबके साचत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने गळतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वान धरणातून येणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या गुरूत्व जलवाहिनीवर गळती दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा दि. १७ ते १९ मे तीन दिवस बंद करण्यात येणार आहे.
---------------------------
जलवाहिनी लिकेजचे जाणीवपूर्वक प्रयत्न
वान धरणातून पाणी पुरवठा करणारे जलवाहिनीवरील लिकेज पाहता जलवाहिनीची जोडणी असलेल्या लोखडी नटाजवळून गळती होत आहे. त्यामुळे पाण्याचे मोठे डबके साचत आहे. या परीसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय गुरे घेऊन येतात. त्यामुळे गुरांच्या पाण्यासाठी जाणीवपूर्वक जलवाहिनी लिकेज केल्या जात असल्याचे बोलले जाते.