मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, कोल्हापूर विभागाची आघाडी

By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:02+5:302015-12-05T09:09:02+5:30

राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पध्रेत शुक्रवारी पहिल्या सत्रात १९२ लढती.

Leaders of Mumbai, Nashik, Amravati, Nagpur, Kolhapur departments | मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, कोल्हापूर विभागाची आघाडी

मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, कोल्हापूर विभागाची आघाडी

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पध्रेत शुक्रवारी पहिल्या सत्रात १९२ लढती खेळण्यात आल्या. यामध्ये १४, १७, १९ वर्षाआतील मुले व मुलींचा समावेश आहे. सायंकाळ पर्यंंत दुसरी फेरी पूर्ण झाली होती. मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, कोल्हापूर संघाने दुसर्‍या फेरीत आघाडी घेत तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळविला.
१४ वर्षाआतील मुलांमध्ये प्रथम खेमकर मुंबई, हर्षत खान मुंबई, ईश्‍वरी गोलाईत अमरावती, अबोल काळे अमरावती, १७ वर्ष मुली नेहा मनवर नाशिक, जान्हवी गोरे मुंबई, दिव्यांगी जाधव मुंबई, मुलांमध्ये पवन बारी नाशिक, अमित सातवेकर नागपूर, रोहित विटकर पुणे, १९ वर्षाआतील मुली प्राधिका जोशी मुंबई, साक्षी दांधे नागपूर, जान्वही मोरे मुंबई, १९ वर्षाआतील मुले अभय सोगत कोल्हापूर, आशुतोष गिरी मुंबई, विशाल ओव्हळ पुणे यांनी तिसर्‍या फेरीत प्रवेश घेतला. स्पर्धेत पंच म्हणून र्जनादन संगम मुंबई, अनिल रामटेके, राहुल ढोणे यांनी साहाय्यक पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे तांत्रिक संचालन विकास मुकादम करीत आहेत.

Web Title: Leaders of Mumbai, Nashik, Amravati, Nagpur, Kolhapur departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.