एलबीटी कर्मचार्यांचे गुटखा माफियांसोबत ‘कनेक्शन’
By Admin | Updated: September 5, 2014 01:33 IST2014-09-05T01:33:11+5:302014-09-05T01:33:11+5:30
अकोल्यात गुटख्याची कोट्यवधीची उलाढाल; एलबीटीचा पत्ता नाही!

एलबीटी कर्मचार्यांचे गुटखा माफियांसोबत ‘कनेक्शन’
अकोला : एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेने व्यापार्यांनी एलबीटी जमा करण्यास आखडता हात घेतल्याची ओरड प्रशासनाकडून होत असली तरी वसुलीत घसरण होण्यासाठी दुसरेच कारण समारे आले आहे. गुटख्याची साठवणूक व विक्रीवर कडक निर्बंंंध असतानादेखील, शहरात महिन्याकाठी कोट्यवधीच्या किमतीचा गुटखा विक्री होत आहे. मनपाच्या एलबीटी विभागातील एका कर्मचार्याचे गुटखा माफियांसोबत ह्यकनेक्शनह्ण असून याबदल्या त महिन्याकाठी मोठा हप्ता वसुल केल्या जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जकात रद्द करून शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू केला. एलबीटीमुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असा आशावाद होता. परंतु महापालिकेच्या प्रामाणिक अधिकार्यांनी व्यापारीच एलबीटीची नोंदणी व कर जमा करण्यास उत्सुक नसल्याची दवंडी पिटली. व्यापार्यांच्या आड संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी काही व्यापार्यांसोबत हातमिळवणी करीत हप्ता वसुलीचा कार्यक्रम सलग चार महिने राबवला. शहरातील काही होलसेल व्यावसायीकांच्या नोंदणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. हा सर्व प्रकार मध्यंतरी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: काही व्यापारी प्रतिष्ठानांची तपासणी केल्यावर उघड झाला होता, हे येथे उल्लेखनीय. यादरम्यान, एलबीटी विभागाची सूूत्रे उ पायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे सोपवण्यात आली आणि तीन कोटींच्या उत्पन्नाने चार ते सव्वाचार कोटीचा आकडा ओलांडला. असे अस तानासुद्धा काही कर्मचार्यांची दुकानदारी एकदम जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात गुटख्याची साठवणूक व विक्रीवर कडक निर्बंंध असताना बाजारात कोट्यवधीच्या किमतीची उलाढाल सुरू आहे. जकात वसुलीच्यावेळी शहरात कोणते व्यावसायिक गुटखा माफिया आहेत, याची इत्थंभूत माहिती एलबीटी विभागातील दोन कर्मचार्यांना आहे. गुटख्याची विक्री होत असली तरी त्याचा अधिकृत एलबीटी जमा होत नसल्याची बाब संबंधित मनपा कर्मचार्यांच्या पथ्यावर पडली आहे. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या नाकाखाली टिच्चून संबंधित गुटखा माफियांकडून महिन्याकाठी ४0 ते ५0 हजारांचा हप्ता वसूल केला जात आहे. हा प्रकार एलबीटी विभागातील कर्मचार्यांना ज्ञात असल्याने यावर आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
** या भागातून वसुली
काश्मीर लॉज परिसर, श्रावगी टॉवर परिसर, सिंधी कॅम्पस्थित कच्ची खोली, जनता कापड बाजार, रेल्वे स्टेशन चौकातील गुटखा माफीयांकडून महिन्याकाठी हप्ता वसूल केला जात आहे.
** अन्न व औषधी प्रशासन विभागाचे झोपेचे सोंग
शहरात रेडीमेड ड्रेस व कापड विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक गुटखा विक्रीचासुद्धा काळाबाजार करतात. काही महिन्यांपूर्वी शहरालगतच्या फार्म हाऊसमधून कोट्यवधी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हा सर्व माल मध्य प्रदेश मार्गे रेल्वेद्वारे शहरात दाखल होत असल्याची इत् थंभूत माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे आहे. मोठय़ा पान टपर्यांसह चिल्लर टपर्यांवरदेखील खुलेआमपणे गुटख्याची विक्री होत असल्याने या प्रकाराला अन्न व औषधी प्रशासन विभागाची मूकसंमती असल्याचे दिसून येते.