महिला बचतगटांचे उपोषण सुरु
By Admin | Updated: August 12, 2014 21:09 IST2014-08-12T21:09:41+5:302014-08-12T21:09:41+5:30
आहार शिजवून देण्याच्या कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवून महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी

महिला बचतगटांचे उपोषण सुरु
अकोला : महानगरपालिका अंतर्गत शालेय पोषण आहार योजनेत आहार शिजवून देण्याच्या कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवून महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी महिला बचतगटांच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. अकोला मनपा हद्दीत ७00 च्यावर महिला बचतगट असून, त्यापैकी काही नेमक्याच बचतगटांना शालेय पोषण आहार वाटप कामाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. तोदेखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार वाटप कामासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देऊन, पुन्हा निविदा मागविण्यात याव्या, या मागणीसाठी महिला बचतगटांच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणात सुनीता मेटांगे, कल्पना जाधव, शोभा उजागरे, शोभा घाटोळे, शोभा मंडे, माधुरी निचळे, विमल पवार, मीना अटल, जैनबी, बबिता काकडे व इतर पदाधिकारी सहभागी झाल्या आहेत.