चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजना सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:01+5:302021-07-10T04:14:01+5:30
...................... मानवधर्म पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अकोला : मानवधर्म नागरी सह. पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपात्र ...

चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजना सुरू करा
......................
मानवधर्म पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
अकोला : मानवधर्म नागरी सह. पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानपात्र विद्यार्थ्यांची नावे अध्यक्ष संजय देशमुख यांनी सभेत जाहीर केली होती. त्यामध्ये प्रफुल्ल शिवानंद वानखडे,ज्योत्स्ना शत्रुघ्न वाडेकर या विद्यार्थ्यांना उच्च प्रतिच्या स्कूल बॅग भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष दिनकर घोरड व संचालक माणिकराव सरदार, विजय काटे, शिवानंद वानखडे, व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे, विकी क्षीरसागर, कुंदा पवार हे उपस्थित होते.
............................
गरजूंना धान्य किटसचे वाटप
अकोला
जपान एशियन फ्रेंडशिप सोसायटी (जेएएफएस) आणि एचडीएसआय (मानव विकास सोसायटी ऑफ इंडिया) यांच्या सहकार्याने एशियन फ्रेंडशिप सोसायटी (एएफएस) अकोलातर्फे अकोल्यातील आपातापा, आपोती आणि घुसर या गावात मोफत रेशन वितरण करण्यात आले. यावेळी धनराज गवई, भूषण गायकवाड श्रीमती सरोज गवई, स्मृती गवई, शालोम गवई, उज्वल गावंडे, हेमंत उके, राजू पांढरे, गुलाबराव हातोलकर, महिंद्र थोरात, नोएल थोरात उपस्थित होते.
फाेटाे