लातूरचे जिल्हाधिकारी करणार शिर्र्ल्यात श्रमदान
By Admin | Updated: May 15, 2017 01:59 IST2017-05-15T01:59:21+5:302017-05-15T01:59:21+5:30
शिर्ला : शेतकऱ्यांसाठी राबणारे जी. श्रीकांत १५ मे रोजी सकाळी अकोला जिल्ह्यातील शेवटचे श्रमदान शिर्ला गावातील गावकऱ्यांसोबत करून लातूरला रवाना होणार आहेत.

लातूरचे जिल्हाधिकारी करणार शिर्र्ल्यात श्रमदान
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ड्रीम प्रोजेक्ट समजून गत वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणारे जी. श्रीकांत १५ मे रोजी सकाळी अकोला जिल्ह्यातील शेवटचे श्रमदान शिर्ला गावातील गावकऱ्यांसोबत करून लातूरला रवाना होणार आहेत.
सध्या सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेंतर्गत शिर्ला येथील जलसंधारणाच्या विविध कामांनी गती मिळाली आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी अभिनेते आमीर खान शिर्र्ल्यात येऊन गेले. कायम कोरडवाहू असलेल्या या गावातील शेतीला विविध पिके घेण्यासाठी पाणी मिळावे यासाठी व शिर्लाच्या पर्वतावर जलसंधारणाचे विविध प्रयोग करून पावसाचे पडणारे बहुतांश पाणी तेथेच मुरवण्याचा यशस्वी प्रयोग जी. श्रीकांत यांचे मार्गदर्शनानुसार गावकऱ्यांनी केला. येथे अनेकवेळा श्रमदान केले आहे. त्यांची आठवण सदैव प्रेरणा देत रहावी. यासाठी गावकऱ्यांनी पर्वताला जी. श्रीकांत यांचे नाव दिले आहे.सोमवारी त्यांना सपत्नीक भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गावाशी रेशीमगाठी कायम बांधल्या जाव्या म्हणून श्रीकांत दाम्पत्यास रेशमी साडी, रेशमी सदरा देऊन महाराष्ट्रीयन पद्धतीने सन्मानित केले जाणार आहे.आणि टोपल्याची प्रतिकृती भेट दिली जाईल.