दयानंद चिंचोलीकर यांची अखेर बदली

By Admin | Updated: April 18, 2015 01:51 IST2015-04-18T01:51:02+5:302015-04-18T01:51:02+5:30

अकोला महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या बदलीचे आदेश मनपात धडकले.

Last of Dayanand Chincholikar changed | दयानंद चिंचोलीकर यांची अखेर बदली

दयानंद चिंचोलीकर यांची अखेर बदली

अकोला: महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी मनपात धडकला. चिंचोलीकर यांची मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर एक वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली. मनपाच्या उपायुक्तपदी जून २0१४ मध्ये नियुक्त होणार्‍या दयानंद चिंचोलीकर यांनी अवघे चार महिने प्रशासकीय कामकाज सांभाळले. प्रशासकीय कामकाजावर पकड असणार्‍या चिंचोलीकर यांनी शहरात राबवलेली धडक अतिक्रमण हटाव मोहीम वादाच्या भोवर्‍यात सापडली. खाद्यपदार्थांची रस्त्यावर फेकफाक व सभामंडपातील नासधूस त्यांच्या अंगलट आली. या प्रकरणी भाजपाने उग्र निदर्शने करीत धरणे आंदोलन छेडले होते. थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यात तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर व उपायुक्त चिंचोलीकर यांना अपयश आले. परिणामी कर्मचार्‍यांनी २३ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारल्यानंतर तो सोडविण्यासाठी प्रयत्न न करता चिंचोलीकर यांनी २६ जानेवारीपासून दीर्घ रजेवर जाणे पसंत केले. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर प्रतिनियुक्तीचा आदेश उपसचिव एस.के.सालीमठ यांनी जारी केला.

Web Title: Last of Dayanand Chincholikar changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.