चिक्कीच्या पाकीटात आढळल्या अळ्या
By Admin | Updated: January 26, 2016 02:20 IST2016-01-26T02:20:45+5:302016-01-26T02:20:45+5:30
लोणार येथील प्रकार; अन्न व औषध प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर.

चिक्कीच्या पाकीटात आढळल्या अळ्या
लोणार (जि. बुलडाणा) : पाच रुपये किंमतीच्या चिक्कीच्या पाकीटामध्ये अळ्या व किडे आढळल्याचा प्रकार २५ जानेवारी रोजी येथील एका दुकानामध्ये ग्राहकाच्या निदर्शनास आला. येथील समाधान मापारी यांनी शहरातील एका दुकानामधून ५ रुपये किंमतीचे चिक्कीचे पाकीट खरेदी केले. त्यामध्ये चिक्कीला लागून अळ्या व किडे असल्याचे मापारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित प्रकार दुकानदाराच्या लक्षात आणून दिला असता दुकानदारांनी चिखली येथील मालपुरवठा करणारे संचालक हितेश यांना विचारणा करण्याचे सांगितले. चिक्की खरेदी करणार्या ग्राहकाने हितेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागपूर येथील चिक्की बनविणार्या कंपनीचे मालक महेश गादीया यांना संपर्क करण्याचे सांगितले. चिक्कीमध्ये निघालेल्या अळ्यांमुळे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांनी केवळ जबाबदारी झटकविण्याचेच काम केले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.