कलकत्ता ढाब्याजवळून दारूचा माेठा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:21 IST2021-09-26T04:21:26+5:302021-09-26T04:21:26+5:30

रिधाेरा येथील रहिवासी मधुकर किसन मुंडे वय ५३ वर्ष हा कलकत्ता ढाब्याजवळ देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री ...

Large stock of liquor seized from Calcutta Dhaba | कलकत्ता ढाब्याजवळून दारूचा माेठा साठा जप्त

कलकत्ता ढाब्याजवळून दारूचा माेठा साठा जप्त

रिधाेरा येथील रहिवासी मधुकर किसन मुंडे वय ५३ वर्ष हा कलकत्ता ढाब्याजवळ देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मिळाली़ या माहितीवरुन पाटील यांनी पथकासह छापा टाकून आराेपी मुंडे याच्याकडून ४० हजार रुपये किमतीच्या १० पेट्या विदेशी दारू तसेच ३१ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या तीन पेट्या असा एकूण ७० हजार रुपयांचा दारूसाठा व इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयाचा साठा रिधाेरानजीक असलेल्या कलकत्ता ढाबा परिसरातून जप्त करण्यात आला आहे़ या आराेपीविरुद्ध बाळापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली़

Web Title: Large stock of liquor seized from Calcutta Dhaba