धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त!

By Admin | Updated: March 17, 2016 02:36 IST2016-03-17T02:36:52+5:302016-03-17T02:36:52+5:30

कोम्बिंग ऑपरेशन; जुने शहर व डाबकी रोडवर पोलिसांची कारवाई.

Large arms and ammunition seized! | धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त!

धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त!

अकोला: पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शहरातील डाबकी रोड व जुने शहरात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्या आदेशावरून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये सहा विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात आरोपींना अटक करण्यात आली. एक आरोपी फरार झाला. या मोहिमेत १0 तलवारी, चार सुरे व दोन चाकूसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
डाबकी रोड पोलिसांनी रविवारी रात्री छापा मारून खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी शहजाद खान आरीफ खान याच्या घरातून तलवारींचा मोठा साठा जप्त केला होता. सदर आरोपीच्या घरामध्ये तलवारसह धारदार शस्त्रे बनविण्याचा कारखानाच सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी मंगळवारी मध्यरात्री संपूर्ण जुने शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये सहा विविध ठिकाणांवर छापे मारण्यात आले. या छापेमारीत माजी नगरसेवक मोहम्मद मुस्तफा मो. युसूफ, राष्ट्रपाल सुखदेव शिरसाट, शेख जब्बार शेख महमूद, बिट्टू रामदास वाकोडे तसेच झांझोटे परिवारातील लखन ऊर्फ सतीष मानसिंह झांझोटे, रोहित मानसिंह झांझोटे या सहा आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Large arms and ammunition seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.