प्राचार्याच्या घरातून लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: November 5, 2015 02:10 IST2015-11-05T02:10:07+5:302015-11-05T02:10:07+5:30

अकोला येथील घटना.

Lampas of Lakhas from Principal's house | प्राचार्याच्या घरातून लाखाचा ऐवज लंपास

प्राचार्याच्या घरातून लाखाचा ऐवज लंपास

अकोला - तोष्णीवाल लेआउटमधील ताथोड मंगल कार्यालयानजीकचे रहिवासी असलेल्या एका प्राचार्याच्या घरातून सुमारे लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी उजेडात आली. मूर्तिजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र मनोहर लाडखेडकर हे बुधवारी काही कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या घरातील १0 हजार रुपये किमतीचा मोबाइल, ४0 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, पत्नीच्या पर्समधील १0 हजार रुपये रोख, ७ हजार रुपयांची सोन्याची अंगठी व २0 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी लाडखेडकर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Lampas of Lakhas from Principal's house