एक लाखाचे मोबाईल ट्रकच्या कॅबिनमधून लंपास
By Admin | Updated: July 22, 2014 00:34 IST2014-07-22T00:34:48+5:302014-07-22T00:34:48+5:30
ट्रकची कॅबिन उघडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीचे तीन मोबाईल लंपास

एक लाखाचे मोबाईल ट्रकच्या कॅबिनमधून लंपास
अकोला: गांधी रोडवर उभ्या असलेल्या ट्रकची कॅबिन उघडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीचे तीन मोबाईल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली. ट्रकचालक संतोष नांदुरेच्या तक्रारीनुसार, एमएच ४0 एन ३३0 क्रमांकाचा ट्रक घेऊन एका खासगी कंपनीचे साहित्य घेऊन रविवारी अकोल्यात आला होता. गांधी रोडवर ट्रक उभा असताना रात्री चोरट्यांनी कॅबिनमधील १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.