पाणीटंचाईग्रस्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला कुलूप
By Admin | Updated: May 26, 2017 02:46 IST2017-05-26T02:46:35+5:302017-05-26T02:46:35+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले वाडेगाव येथे एप्रिल महिन्यापसून पूर्ण गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

पाणीटंचाईग्रस्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले वाडेगाव येथे एप्रिल महिन्यापसून पूर्ण गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त महिलांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. निवेदन घेण्यासाठी कुणीही नसल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले, तसेच निवेदन दरवाजावर चिकटून दिले.
वाडेगाव गावाची लोकसंख्या २२ हजारांच्या जवळपास आहे. ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले असता तेथे कुणीही हजर नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला कुलूप लावले, तसेच निवेदन दरवाजावर चिकटून दिले. या निवेदनावर वंदना काकड, अनिताबाई काकड, लांडे, सरस्वती लांडे आदींची स्वाक्षरी आहे.