आरोग्य केंद्रात नियोजनाचा अभाव रुग्ण त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:04+5:302021-07-07T04:24:04+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत परिसरातील नागरिकांचा विविध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो; परंतु वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्णांना ...

Lack of planning in health centers plagues patients, neglect of administration | आरोग्य केंद्रात नियोजनाचा अभाव रुग्ण त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष

आरोग्य केंद्रात नियोजनाचा अभाव रुग्ण त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत परिसरातील नागरिकांचा विविध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो; परंतु वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे.

आरोग्य केंद्रात रुग्णांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध असलेले वाॅटर फिल्टर मशीन बंद अवस्थेत असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्याअभावीच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. रुग्णांच्या सेवेसाठी उपयुक्त असलेले साहित्य बंद खोलीत धूळ खात पडले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गर्दी होत आहे. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वाढलेले गवत व अस्वच्छतेमुळे तसेच कोलमडून पडलेल्या एकंदरीत सेवा सुविधा संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियोजनशून्य कारभार असून दुर्लक्षितपणा असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

फोटो:

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा नियोजनशून्य कारभार व वॉटर फिल्टर मशीन बंद आहे. याला तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा बेजबाबदार कारभार कारणीभूत आहे. नागरिकांसह रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

- मंगेश तायडे, सरपंच

वाडेगाव

Web Title: Lack of planning in health centers plagues patients, neglect of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.