अकोला जिल्हय़ातील दुग्धोत्पादन घसरले!
By Admin | Updated: January 2, 2015 01:30 IST2015-01-02T01:30:21+5:302015-01-02T01:30:21+5:30
दुधाची आवक वाढली, भेसळयुक्त दुधाची होताहे विक्री.

अकोला जिल्हय़ातील दुग्धोत्पादन घसरले!
अकोला : जिल्ह्यातील दुग्धोत्पादन घसरले असून, जिल्हय़ाबाहेरील दुधाची आवक वाढल्याने, या दुधाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी दहा ते बारा विक्रेत्यांकडे भेसळयुक्त दुधाचे नमुने आढळले; परंतु ठोस कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.
या जिल्हय़ाची लोकसंख्या बघता या जिल्ह्याला दररोज तीन ते साडेतीन लाख लीटर दुधाची गरज आहे. तथापि जिल्ह्यातील दुग्धोत्पादन ७0 ते ८0 हजार लीटरच्या जवळपास आहे. असे असताना जिल्हय़ातील नागरिकांची दुधाची गरज या अल्प दुधावर भागतेच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने जिल्हय़ात यावर्षी मोठय़ा प्रमाणात दुधाची आवक वाढल्याचे वास्तव समोर आले आहे.
बाहेरील जिल्ह्यातील काही पिशवीबंद दूध अकोला महानगरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पोहोचविले जात आहे. तथापि, बाहेरू न येणारे दूध शुद्ध आहे, याची चाचणी, तपासणी संबंधित विभागाकडून केली जाते का? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मिळणार्या काही दुधात प्रामुख्याने पाणी, भुकटी, साखर व काही प्रमाणात इतर प्रयोग केले जात असल्याने या चितेंच्या विषयावर शहरात चर्चेला वेग आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरात दुधाचे काही नमुने घेतले आहेत. त्यातील काही नमुन्यात दोष आढळले आहेत. पण, अद्याप एकाही भेसळयुक्त दूध विक्रेत्यावर कारवाई झाली नसल्याचेच एकूणच चित्र समोर आले आहे. भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम लक्षात घेता भेसळयुक्त दुध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुधाची नियमित चाचणी घेतली जात असून, भेसळयुक्त दूध आढळले तर त्यावर कारवाई केली जात असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी एन.आर. ताथोड यांनी सांगीतले.