शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवा केंद्रातील कामगारांची शेतकऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:19 IST

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग कृषी सेवा केंद्रातील दोन कामगारांनी एका शेतक ºयास फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग कृषी सेवा केंद्रातील दोन कामगारांनी एका शेतक ºयास फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी शेतकºयाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन कामगारांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.कीर्ती नगर येथील रहिवासी प्रताप शरदचंद्र देशमुख हे त्यांची दुचाकी बजरंग कृषी सेवा केंद्राच्या गोदामासमोर ठेवून बियाणे परमिट आणण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले होते. परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या दुचाकीच्या टायरमधील हवा सोडलेली दिसली. त्यांनी बाजूलाच असलेल्या कामगारांना विचारणा केली असता बजरंग कृषी सेवा केंद्रात कामगार असलेल्या सत्यम ऊर्फ जयेश संजय पांढरे रा. लहान उमरी आणि ऋषिकेश ऊर्फ ऋषी दादाराव ताथोड रा. निंभोरा या दोघांनी देशमुख यांना बेदम मारहाण केली. फावड्याचा लाकडी दांडा व लोखंडी पाइपने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रताप देशमुख यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता शरीरातील हाडे मोडल्याचे समोर आले. त्यामुळे देशमुख यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी