‘रोहयो’साठी मजुरांची बाजारात नोंदणी
By Admin | Updated: November 23, 2014 23:50 IST2014-11-23T23:50:55+5:302014-11-23T23:50:55+5:30
अमरावती विभाग : योजनेत उपस्थिती वाढविण्याचा उपक्रम.
‘रोहयो’साठी मजुरांची बाजारात नोंदणी
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गतच्या कामांवर मजुरांची उपस्थिती वाढावी, यासाठी आठवडे बाजाराच्या ठिकाणी मजुरांची नोंदणी करण्यात येत आहे. अमरावती विभागातील पाचही जिलंमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे प्रमाण वाढविण्यासाठी मजुरांची उपस्थिती वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या ह्यरोहयोह्ण विभागामार्फत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिलंमध्ये प्रत्येक तालुक्यात आठवडे बाजाराच्या ठिकाणी मजुरांकडून कामांची मागणी नोंदविली जात आहे. त्यासंबंधीचे अर्ज भरून घेतले जात आहे. त्याची यादी पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांकडे पाठवून मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करुन दिली जात आहेत.
रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती वाढावी. त्याद्वारे कामांना गती मिळावी. मागणीप्रमाणे मजुरांना काम उपलब्ध व्हावे, यासाठी बाजाराच्या ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली असल्याचे अमरावती विभागाचे उपायुक्त एस.टी.टाकसाळे यांनी दिली.
*अशी नोंदविली जाते मागणी!
तालुक्याच्या ठिकाणच्या आठवडे बाजाराच ह्यरोहयोह्णचे तालुकास्तरावरील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पालक तांत्रिक अधिकारी, विशेष कार्यक्रम अधिकारी व नायब तहसीलदारांकडून नमुना क्र. ४ च्या अर्जाद्वारे मजुरांकडून कामाची मागणी नोंदविली जाते. ती पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्याकडे पाठविली जाते. गटविकास अधिकारी संबंधित ग्रामपंचायतींकडे प्रकरणे वर्ग करतात.