खामगाव पालिकेसमोर कुत्रे भुंकी आंदोलन
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:59+5:302016-03-16T08:36:59+5:30
अभिनव आंदोलनाद्वारे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी.

खामगाव पालिकेसमोर कुत्रे भुंकी आंदोलन
खामगाव : श्वान पाळीव प्राणी म्हणून पाळणे ठीक आहे. त्याचा माणसाला लागणारा लळा ही सहृदयतेचीच बाब म्हणावी लागेल; मात्र सद्यस्थितीत शहरात हैदोस घालणार्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मात्र गंभीर झाला आहे. वारंवार तक्रार देऊनदेखील पालिका प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली नाही. यामुळे त्रस्त नागरिकांनी अखेर मोकाट कुत्र्यांची समस्या प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी कुत्र्यांचा ध्वनिमुद्रित आवाज प्रशासनाला लाउडस्पीकरवरून ऐकवून अभिनव आंदोलन मंगळवारी शहरात केले.
आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकार्यांना निवेदनदेखील दिले. निवेदनात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मोकाट कुत्र्यांची नसबंदी करावी, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्या कुत्र्यांना मारण्यात यावे, न.प. रुग्णालयात रॅबिज इंजेक्शन उ पलब्ध करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मो. बिलाल मेमन यांच्यासह माजी नगरसेवक आरिफ पहेलवान, गुलजमा शाह आदींचा सहभाग हो ता.