अकोला जिल्ह्यात २११ ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:56 PM2019-02-06T12:56:31+5:302019-02-06T12:56:45+5:30

अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित करण्यात आल्या.

Krishi Sanjeevani Samiti formed 211 in Akola district! | अकोला जिल्ह्यात २११ ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित!

अकोला जिल्ह्यात २११ ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित!

Next

अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित करण्यात आल्या असून, समितीच्या सदस्यांना ६ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ८३ ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) राजेंद्र निकम यांनी मंगळवारी दिली.
खारपाणपट्टा आणि आणि हवामान बदलामुळे बळी पडणाºया गावांसाठी शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील ४९८ गावांची निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १०५ गावांमध्ये योजनेंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत. दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या ग्रामसभांच्या मान्यतेने स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रकल्प योजनेची अंमलबजावणी या समित्यांद्वारे होणार असल्याने, समित्यांच्या सदस्यांना प्रकल्प अंमलबजावणीचे प्रशिक्षण ६ फेबु्रवारी रोजी आॅनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील ८३ ठिकाणी एकाच वेळी देण्यात येणार आहे. वातावरण बदलामुळे होणाºया नुकसानासंदर्भात प्रकल्पातील गावांना सक्षम करण्यासाठी आवश्यक असणाºया पीक पद्धती, कृषी पूरक व्यवसाय, मृद संधारण, गटांचे बळकटीकरण, ग्राम कृषी संजीवनी समितीचे कर्तव्य व जबाबदारी आणि योजना राबविण्याची कार्यपद्धती इत्यादी विषयांची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात समिती सदस्यांना देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निकम यांनी सांगितले. त्यावेळी अकोल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी उपस्थित होते.

समिती सदस्यांना ८३ ठिकाणी दिले जाणार प्रशिक्षण!
जिल्ह्यातील २११ ग्रामपंचायत स्तरावर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी संजीवनी समित्यांच्या सदस्यांना एकाच वेळी जिल्ह्यातील ८३ ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात १४, मूर्तिजापूर तालुक्यात २०, बार्शीटाकळी तालुक्यात २, अकोट तालुक्यात १७, बाळापूर तालुक्यात १३, पातूर तालुक्यात २ व तेल्हारा तालुक्यात ९ ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सांगितले.

 

Web Title: Krishi Sanjeevani Samiti formed 211 in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.