किशोर खत्री हत्याकांडात साक्षीदाराचे बयान तपासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:21 IST2017-11-01T01:20:26+5:302017-11-01T01:21:10+5:30
अकोला: शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांनी मंगळवारी या प्रकरणातील एका साक्षीदाराचे बयान तपासले. बचाव पक्षानेही यावेळी उलट तपासणी केली असून, पुढील प्रक्रिया आता १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

किशोर खत्री हत्याकांडात साक्षीदाराचे बयान तपासले
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांनी मंगळवारी या प्रकरणातील एका साक्षीदाराचे बयान तपासले. बचाव पक्षानेही यावेळी उलट तपासणी केली असून, पुढील प्रक्रिया आता १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती. हत्याकांडाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. दरम्यान, खत्री हत्याकांडप्रकरणी अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून, चार टप्प्यांमध्ये ते सुनावणीसाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे. यासाठी अँड. निकम रविवारी रात्रीच अकोल्यात दाखल झाल्यानंतर सोमवारी ते साक्षीदार तपासणार होते; मात्र ती तपासणी मंगळवारी ठेवण्यात आली, मंगळवारी अँड. निकम यांनी एका साक्षीदाराची तपासणी केली आहे. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अँड. उज्जवल निकम, अँड. गिरीश देशपांडे यांनी तर आरोपींच्या वतीने अँड. वसीम मिर्झा, अँड. दिलदार खान व अँड. हातेकर यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरणात रणजितसिंह चुंगडे, रू पेश चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहरे हे आरो पी आहेत.