शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:12 IST

Kisan App : सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ संपल्यावर संदेश येत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये निर्माण होतो संभ्रम फायदा कमी, डोकेदुखी जास्त
अकोला : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे हवामानाची माहिती, शेतीविषयी मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता कृषी विभागाने किसान ॲप सुरू केले आहे. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो; परंतु काही दिवसांपासून शेतकऱ्यांना वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे.किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन- तीन दिवस उशिरा मिळत आहेत. १ ते ४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उशिरा आला. सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ संपल्यावर संदेश येत आहेत. त्यामुळे हे ॲप नावापुरतेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदा कमी डोकेदुखी जास्त बनले आहे.किसान ॲपवर काय मिळते माहिती?ॲपवरून शेतकऱ्यांना कृषी हवामानविषयक माहिती मोबाईलवर पाठवून उपयुक्त सल्ले देण्यात येतात.जिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्र यांची माहिती देण्यात येते.जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचे बाजारभाव देण्यात येतात. त्यामुळे दर माहिती करणे सोयीस्कर होते.पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत माहिती देण्यात येते.अपडेट वेळेत मिळावे...हवामान, वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळावे, त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यात सोयीस्कर होईल.बाजारभाव दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.पीक संरक्षण सल्ला वारंवार अपडेट करावा, जेणेकरून बंदी असलेली कीटकनाशके कळतील.इशारा मिळाला पण वादळ येऊन गेल्यानंतर!हवामान बदलात सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरणाचे संदेश मिळाल्यास पिकांची निगा राखण्यास फायदेशीर ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपच्या माध्यमातून माहिती अपडेट करण्यात येत नसल्याने अडचणी येत आहेत.- नीलेश गवई, शेतकरीपूर्वी पोस्टातून येणारी तार (टेलिग्राम) पत्र, नोकरीचा कॉल हे तारीख निघून गेल्यावर मिळाल्याचे अनेकांना ऐकिवात आहे. त्यास किसान ॲपच्या संदेशामुळे उजाळा मिळत आहे. जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. आगामी काळात तरी किसान ॲपवरून दिले जाणारे संदेश, सावधानतेचे इशारे हे किमान एक-दोन दिवस अगोदर मिळावेत.- राजेश पाटील, शेतकरीकिसान ॲपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यावर शेती करताना चांगला उपयोग होतो. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा येत आहेत. त्यामुळे वरातीमागून घोडे असा प्रकार घडत आहे. पूर्वीप्रमाणे हे संदेश यावेत.- विश्वनाथ इंगळे, शेतकरी
टॅग्स :AkolaअकोलाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळAgriculture Sectorशेती क्षेत्रweatherहवामानFarmerशेतकरी